Thursday, October 1, 2009

नशा




तो चंद्र..
चंद्राच्या गालावर ती छोटीशी खळी
रात्रीच्या गप्पा ऐकतांना हळूच उमटलेली..

मंद वारा..
मंद मंद वार्‍याचा धुंद सुगंध
सुगंधात न्हाऊन लाजरी कळी उमललेली..

तुझे डोळे..
तु़झ्या डोळ्यात मी
माझ्या डोळ्यात तू साठ्वून घेतलेली

माझे शब्द,
शब्दात तू नशा घेउन आलेली
जशी रात्रीला अंधारची नशा, चंद्राच्या चांदण्याची नशा
मीटलेल्या पाकळ्यांना, उमलण्याची नशा

ती नशा..
रात्रीच्या नशेची ती किती सारी कोडी
मनाला आजवर न उलगडलेली..


Saturday, June 6, 2009

भ्रम

जगणं एक भ्रम आहे, तरी प्रत्येक जण या भ्रमात जगतो
कुणी भोगत जगतो, कुणी जगताना भोगत असतो

जगतो कुणी क्षणभर कुणी क्षणासाठी जगतो
कुणी क्षणभर जगून सुद्धा रात्रभर जागतो

Thursday, January 22, 2009

कधी तू पण..

तू पण कधी आपल्यासाठी
नवा साझ छेड्शील का?
धुन्द होउन स्वरान्सोबत
गगनाला भिड्शील का?

Sunday, October 26, 2008

तू तिथं मी !




तू जीवन धारा मी रंग..
तुझ्यात विरघळून तू जाशील तिथे वाहत जाणारा

तू झुळूक मी सुगन्ध..
तूझ्यात मिसळून तू जाशील तिथे वाहत जाणारा

तू ताल मी मुक्त छंद..
तूझ्यात खेळून तू नेशील तिथे जाउन थांबणारा


Wednesday, August 13, 2008

आज तू निज..




निज तू आज..
आज मी तुला निजवीन

रोज तुला जागवतो पण
आज मी पण जागून पाहीन


थोड्या बन्द पापण्या तुझ्या..
थोड्या खुल्या माझ्यासाठी
थोड्या त्या जागेत पण मी..
मी मला शोधून पाहीन

निज तू आज..
आज मी तुला निजवीन


वार् याची एक गार झुळूक
तुला हळूच कुरवाळून जाईल..
थकून निजलेल्या केसांत तुझ्या
मी पण हात फिरवून पाहीन..

निज तू आज..
आज मी तुला निजवीन

रोज तुला जागवतो पण
आज मी पण जागून पाहीन


Monday, July 7, 2008

७ ची जादू

लवकरच येत आहे....

http://tinyurl.com/magic-of-7

Wednesday, June 25, 2008

आसमंत सारा तूझा आह

घे भरारी ऊंच गगनात, आसमंत सारा तूझा आहे
पंखांमधे बळ तुझ्या, ओढ आसमंताची आहे
ओढ अशी रक्तात की आसमंत खुजा आहे
भरारीचं वेड तुझ्या पंखातलं बळ आहे
घे भरारी ऊंच गगनात, आसमंत सारा तूझा आहे